काखे चांदोली वसाहतीतील बेपत्ता असलेले शेतकरी गणपती हरी पाटील (वय ५५) यांचा मृतदेह मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी साडे 4 वाजता काखे येथील कोकाटे मळीजवळ वारणा नदीपात्रात तरंगताना आढळून आला.यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृत पाटील हे रोजंदारीवर शेतीच्या कामासाठी जात असत.३० ऑगस्ट रोजी सकाळी ते शेतीकामासाठी घरातून निघाले,मात्र रात्री उशीरापर्यंत परतले नाहीत.कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता काखे-मांगले पुलाजवळ त्यांची सायकल सापडली.