ऊसतोडणीसाठी कारखान्यावर येतो म्हणून ९० हजार रुपये उचल घेऊन कामावर न येता तक्रारदाराची दिशाभूल केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव (काजळे) येथील दाम्पत्यावर चारठाणा पोलिसांत मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा येथील यमुनाबाई आसाराम राठोड यांनी तक्रार दिली. ऊसतोडणीसाठी कारखान्यास येतो असे म्हणून बंधपत्र लिहून दिले होते.