नायगाव या गावात चुरामण गंगाधर कोळी हे राहतात. त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर त्यांची मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९ सी.के.२५२८ ही लावली होती. तेव्हा घराबाहेर लावलेली त्यांची ही मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली हा प्रकार निदर्शना झाल्यानंतर प्रारंभी त्यांनी मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.