जिथे ज्ञानाचे धडे दिले जातात, त्याच विद्येच्या मंदिराला गुन्हेगारीचा अड्डा बनवल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात उघडकीस आला आहे. मांजेरी घाट येथील जिल्हा परिषदेच्या एका बंद शाळेच्या खोलीत बेकायदेशीरपणे साठवलेला तब्बल १४ लाख ४२ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून जप्त केला. अशोक गीते असे त्या व्यक्तीचे नाव आहे त्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.