वाघोली येथील शेतकरी व ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच, सदस्य यांचे तहसीलदार व कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे की, सतत येणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकाची नासाडी झाल्यामुळे तत्काळ सर्वेक्षणाचे आदेश अधिनिस्त कार्यालयाला देण्याबाबत निवेदन देण्यात आले.पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊन सोयाबीनचे उभे पीक पिवळे पडलेले असून ते वाळत आहेत .सोयाबीन पिकाचे होणारे नुकसान पाहून शेतकरी चिंतेत पडले तेव्हा शेतकरी हवालदिल व निराश झाला आहे .करिता सोयाबीन पिकाच्या संरक्षणाचे आदेश तालुका कृषी विभागाला द्यावे.