दिग्रस शहरासह तालुक्यात गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अरुणावती धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली. शुक्रवारी सकाळी धरण प्रशासनाने सुरुवातीला ३ गेट उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला. मात्र दिवसभर मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्याने सायंकाळपर्यंत एकूण ९ गेट उघडून विसर्ग करण्यात आला. शनिवारी दि. ३० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रणात येऊ लागली आहे. त्यामुळे सध्या ११ पैकी फक्त ३ गेट उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.