सद्यस्थितीत मान्सून सक्रिय असून बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे नद्या, नाले, ओढे व पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे. परिणामी अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असून नागरिकांकडून निष्काळजीपणामुळे अपघातांच्या घटना घडत आहेत. सदर परिस्थितीचा विचार करून जिल्हा प्रशासनामार्फत सर्व नागरिकांना खबरदारीचे आवाहन व दक्षता सूचना करण्यात आल्या आहेत.