कुमठे, ता. कोरेगाव येथील गायरानावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची हालचाल जिल्हा पातळीवर गतिमान झाली असून ग्रामस्थांनी त्यास तीव्र विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुका महसूल प्रशासनाच्यावतीने मंगळवार दि. ९ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता प्रांताधिकारी कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात कोरेगाव तहसीलदार कार्यालयातून सोमवारी दुपारी चार वाजता माहिती मिळाली.