महायुती सरकारला आरक्षण द्यायचे नाही, त्यांनी आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाज आणि ओबीसींमध्ये वाद लावून दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी बांधील असलेल्या भाजपला आरक्षण हा विषय मान्य नाही, त्यामुळे केवळ राजकीय दृष्टिकोनातून भूमिका घेतली जात आहे, असा जाहीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार यांनी केला. कराड येथे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि महायुती सरकारवर टीका केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख उपस्थित होते.