काल सहा ऑगस्ट रोजी अकरा दिवसाच्या गणरायाचे अगदी भक्ती भावाने विसर्जन करण्यात आले.यावेळी अनेकांना आश्रु अनावर झाले आणि तसे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातच बदलापूरच्या एका कुटुंबियाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बदलापूरच्या बेलवली परिसरातील जोशी कुटुंबीयांच्या घरी अकरा दिवसाच्या गणरायाच्या आगमन झाले. ११ दिवस सेवा केल्यानंतर काल विसर्जनाच्या वेळी घरातल्या चिमुकल्याला आणि त्याच्या आईला अश्रू अनावर झाल्याने तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.