भंडारा तालुक्यातील सुभाष वार्ड गणेशपुर येथे न्यू कुमार गणेशोत्सव मंडळच्या वतीने नवसाचा राजाची स्थापना दिनांक 27 ऑगस्ट रोजी करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात मंगलमय वातावरणात गणरायांचे आगमन झाले. दरम्यान दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता दरम्यान भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नवसाचा राजा न्यू कुमार गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. यावेळी आमदार भोंडेकर यांनी गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेत जनतेच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.