वाठार गावातील गायरान जमिनीचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळला असून,बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाने बनावट कागदपत्रांच्या आधारे गावच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या प्रकारामुळे गावातील शेकडो गोरगरीब कुटुंबांचे हक्क धोक्यात आल्याने या संदर्भात गावकऱ्यांनी आंदोलन छेडले मात्र,त्यांच्या आवाजाला खासदार धैर्यशील माने यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती आंदोलकानी रविवार दि 24 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता मा खा राजू शेट्टी यांच्या समोर व्यक्त केली.