तालुक्यातील राजूर कॉलरी परिसरात सुरू असलेल्या वरली मटका आणि इतर अवैध धंद्यांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी वणी पोलिसांना दोन दिवसांत कठोर कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.