लाकडाची विनापरवाना तोडणी करून वाहतूक केल्याप्रकरणी वनविभागाने रविवारी सकाळी साडेअकरा वाजता धडक कारवाई केली आहे. तांबवे पूल, ता. कराड येथे कारवाईदरम्यान वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाच्या वराडे परिमंडळचे वनपाल संतोष जाधवर यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार तांबवे पुल, ता. कराड या ठिकाणावरून ट्रकमध्ये विनापरवाना लाकुडतोड करून माल वाहतुक करताना आढळून आल्याने वनविभागाने पकडला.