इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून सध्या नदीची पाणीपातळी ६९ फुटांवर पोहोचली आहे.नदीची धोका पातळी ७१ फूट असून पाण्याच्या सतत वाढत्या प्रवाहामुळे नदीकाठच्या नागरी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.गुरुवारपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी राधानगरी व कोयना धरणातून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील विसर्गामुळे नदीच्या पातळीत वाढ सुरूच आहे.पुरामुळे वरदविनायक गणपती मंदिर,श्री रेणुका माता मंदिर यांसह अनेक लहान मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.