लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवार दि.७ ऑगस्ट रोजी दुपारी पोस्ट ऑफिस जवळ सर्व प्रथम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर अश्वमेध रथात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा ठेवून शहरातून वाजत गाजत रात्री ८ वाजेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूकीचे आयोजन लखन गुलाबराव डोंगरे लहुजी शक्ती सेना शहराध्यक्ष तसेच समाज बंधू पप्पू मानकर,नरेश गवई,कृष्णा डोंगरे,गोविंदा तायडे,शंकर नाटकर,संतोष डोंगरे यांच्या सह अबाल वृद्धासह महिलां सहभागी होते.