धारूर तालुक्यातील आवरगाव गावातून वाहणारी वान नदी गेल्या झालेल्या मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून वाहत आहे. नदीचे पाणी मोठ्या वेगाने वाहत असल्याने धारूर–आडस–अंबाजोगाई हा मुख्य मार्ग आजही पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. पुराच्या पाण्यातून जाण्याचा कोणताही धोका नागरिकांनी अजिबात पत्करू नये, अन्यथा गंभीर अपघात किंवा जीवितहानी होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.