अकोली येथे बँकेच्या अधिकाऱ्यास दोघांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना ३० जुलै रोजी दुपारी १.३० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.याबाबत सागर गजानन सकळकळे वय 30 वर्ष, रा. चौकसे ले आऊट यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, ॲक्सिस बँकेच्या खामगाव शाखेतून उषा मुजुमले यांनी ३५ हजार रुपये कर्ज घेतले होते. कर्जाचे १६ हप्ते म्हणजे ३३ हजार ४२० रुपयाची रक्कम परतफेड केली.त्यांच्याकडे १० हजार ३१२ रुपये गटाचे कर्ज थकित असल्याने ५ हजार ५५० रुपये भरणा करा, असे सांगण्यासाठी गेलो होतो.