अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असणारा अकोलखेड येथे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात गणेश उत्सव तसेच ईद संदर्भात शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी गणेश उत्सव व गणपती बाप्पा विसर्जन व ईद या मिरवणुकांबाबत ठाणेदार किशोर जुनघरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर विविध सण उत्सव नियमांच्या चौकटीत राहून शांततेत साजरे करण्याबाबत आवाहन देखील यावेळी ठाणेदार जुनघरे यांनी केले असून या बैठकीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.