शिवनाकवाडी येथे विना परवाना देशी-विदेशी दारूची विक्री करताना रविवारी रात्री 10 वाजता एकाला कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली आहे.कारवाईत 10 हजार,750 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.शगुन संतोष टिळंगे (रा.शिवनाकवाडी)असे अटक केल्याचे नाव आहे.लोकसभा निवडणुकीचे मतदान होईपर्यंत निवडणूक विभागाच्या आचारसंहिता पथकाने देशी दारू दुकान बियर बार दारू विक्री करणे व साठा करण्यास बंदी असताना शिरोळ तालुका निवडणूक विभागाचे प्रमुख तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या पथकाला मिळाल्याने कारवाई केली.