परभणी हिंगोली मार्गावर औंढा नागनाथ शहरातील बसस्थानका जवळ मंदिर कमान समोर सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने ओबीसी प्रवर्गात इतर जातीची होणारी घुसखोरी थांबवण्यात यावी व मराठा आरक्षणासंदर्भाने सरकारने काढलेला हैदराबाद जीआर रद्द करावा या मागणीसाठी दिनांक दहा सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी बारा ते दोन वाजे दरम्यान तब्बल दोन तास रास्ता रोको करून मागण्याचे निवेदन तहसीलदार हरीश गाडे यांना दिले यादरम्यान जिंतूर छत्रपती संभाजी नगर वसमत तसेच हिंगोली कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.