सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कुमठे गावच्या हद्दीत असलेल्या गायरान जमिनीतील एक फूटभर ही जागा सौर ऊर्जा प्रकल्पासाठी देणार नाही असा एकमुखी निर्धार ग्रामस्थांनी मंगळवारी दुपारी दीड वाजता केला. प्रांताधिकारी कार्यालयात झालेली संयुक्त बैठक निर्णय न होता संपली. प्रशासन मात्र ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्राकडे पाहत बसले. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेअंतर्गत शासनाकडून कुमठे गायरान क्षेत्रात पैकी 32 एकर क्षेत्रावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.