मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा 4था दिवस आहे. मात्र अद्याप सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. मुंबईतील रेल्वे स्टेशन,मनपा मुख्यालय आणि फुटपाथ वर आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. तसेच मुंबईकडे आंदोलकांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात असून आनंदनगर टोलनाक्यवर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.