माण तालुक्यातील मोगराळे येथील डोंगर कपारीत जनावरांची बेकायदेशीर कत्तल केली जात असल्याची माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तात्काळ बुधवारी कारवाई केली. एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दहिवडी पोलीस ठाण्यातून दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार फलटण तालुक्यातील तरडगाव येथील अवधूत गोरख धुमाळ हे गेल्या सहा वर्षापासून गोरक्षणाचे काम करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कारवाई करण्यात आली.