भंडारा शहरातील राजेंद्रवार्ड झोपडपट्टी शुक्रवारी येथे भंडारा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. २३ ऑगस्ट रोजी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता आरोपी मंगेश दूरबुदे वय २६ वर्षे रा. भंडारा व इतर जवळपास १० आरोपी हे ५२ तास पत्तीवर जुगार खेळत असताना मिळून आले. सदर आरोपींच्या ताब्यातून ५३ तास पत्ते, ५ नग मोबाईल व जुगार खेळण्याची विविध साहित्य असा एकूण किंमत ३८ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.