साकळी या गावाकडून किनगाव कडे जाणारा रस्त्यावर भारत तोल काटा आहे. या तोलकाट्यासमोर दुचाकी क्रमांक एम. एच.१९ एक्स. १७४४ द्वारे मोहित कुवर वय २२ रा.यावल हा तरुण येत होता त्याला यावल कडून चोपड्याकडे जाणाऱ्या क्रुझर चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.१९ बी.यु.२१२९ वरील चालकाने धडक दिली या अपघातात दुचाकी स्वार तरुण ठार झाला. तेव्हा या अपघात प्रकरणी यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.