गंगाखेड तालुक्यातील सायळा सुनेगाव येथील मुख्य चौकात असलेल्या नालीत सात ते आठ महिन्याचे स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आल्याची घटना गुरुवार ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच गंगाखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून नवजात अर्भकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी पोलीस पाटील गोविंद सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीसात अज्ञाता विरोधात गुरुवार ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता गुन्हा दाखल.