इचलकरंजी शहरात साकारत असलेल्या झिरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD) प्रकल्पामुळे शहर 'ग्रीन सिटी'च्या दिशेने मोठ पाऊल टाकत असून पंचगंगा नदीचे प्रदूषण तसेच सांडपाणी समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे.सुमारे 609.58 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता महापालिका सभागृहात पार पडले असल्याची माहिती आमदार राहुल आवाडे यांनी आज मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता दिली आहे.