Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: गणेश विसर्जनासाठी जिल्ह्यातील नदी, नाले व बंधाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज; विसर्जन सोहळा सुरळीत सुरू

Akola, Akola | Sep 6, 2025
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नदी, नाले व बंधाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापनाची तयारी पूर्ण झाली आहे. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून पुर्णा नदी गांधीग्राम येथे तहसीलदार अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली वंदे मातरम बचाव पथक बोट व साहित्यांसह सज्ज आहे. तर मन नदी भिकुंड बंधारा (ता. बाळापुर) येथे तहसीलदार बाळापुर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत सायरे यांच्यासह पथक तैनात आहे. पोपटखेड प्रकल्प (ता. अकोट) व काटेपूर्णा नदी कुरणखेड येथेही पथके सज्ज राहून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us