तान्हा पोळा हा सण कृषिप्रधान संस्कृतीतून उगम पावलेला आहे. हा प्रौढ शेतकऱ्यांच्या बैलांचा सण असला तरी मुलांमध्ये शेतकरी व शेतीविषयी प्रेम व आत्मीयता निर्माण व्हावी या दृष्टीने स्व.अजयकुमार गेंदलालजी साहू व स्व. दिलीपकुमार गेंदलालजी साहू यांनी 2013 पासून इंदिरा मार्केट रोड येथे तान्हा पोळ्याच्या आयोजनाची सुरवात केली,हळू हळू साहू परिवारांचा हा तान्हा पोळा मोठं स्वरूप घेत दूरवरून लहान मुले विविध वेशभूषा धारण करत आपल्या लाकडी नंदी बैलाला सुरेख सजावट करून आणत तान्हा पोळा साजरा करत होते,साहू