कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरला शिवीगाळ करून सरकारी कामात व्यत्यय आणल्याची घटना 22 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान घडली आहे. याबाबतीत डॉ. मयूर केदार कुमार कौलकर यांनी 23 ऑगस्टला दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. नांदगाव खंडेश्वर येथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरला रुग्णालयात साप चावल्याचा पेशंट दाखल करण्यात आल्याने सर्वप्रथम आमच्या पेशंटला पहा असे म्हणून शिवीगाळ केली व अपमान केला तसेच कॉलर पकडून हमला केला असल्याचे दाखल केलेल्या....