दिग्रस तालुक्यातील खेड्यांमध्ये ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेचे शालेय शिक्षक हे शासनाने नेमलेले असले तरी अनेक कर्मचारी दिलेल्या मुख्यालयी वास्तव्यास न राहता तालुक्याच्या ठिकाणी राहून कामकाज करतात. यामुळे गावातील नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे व इतर कामांसाठी त्रास सहन करावा लागतो. याच निषेधार्थ भूमिपुत्र संघटनेने आज शनिवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत विरुगिरी आंदोलन छेडले. नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीवर तब्बल अडीच तास आंदोलन केले.