भंडारा जिल्ह्यातील ढोलसर येथील मार्शल लेकराम फुंडे वय 31 वर्षे याने विषारी औषध प्राशन केल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला ग्रामीण रुग्णालय पवनी येथे दाखल केले. त्यानंतर त्याला दिनांक 20 ऑगस्ट रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले असता दिनांक 23 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता दरम्यान त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेच्या पुढील तपास पोलिस हवालदार ढोरे हे करीत आहेत.