मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीत काही आरोपी हे जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून आंधळगाव पोलिसांनी दिनांक 23 ऑगस्ट रोजी जुगार्यांवर धाड टाकून कारवाई केली असता 10 आरोपी हे अवैधरित्या जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी 52 तास पत्ते मोटरसायकल मोबाईल फोन व जुगार खेळण्याचे विविध साहित्य असा एकूण किंमत 2 लाख 91 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सदर आरोपींवर आंधळगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.