कुरुंदवाड शहर व परिसरात आज रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत गौराईचे आगमन मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात झाले. शहरातील शिवतीर्थ व गणेश मंदिर परिसरात महिलांनी पारंपरिक वेशात सजून गौराईची पूजा करून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या.घरोघरी गौराईचे स्वागत करत सुहासिनींनी थाटात प्रतिष्ठापना केली.गौराई पूजनासाठी विविध प्रकारचे कलश – जलकलश, हराळी कलश,गौरी कलश आणि तांब्याचे कलश- फुलांनी,हारांनी,मंगळसूत्राने सजवले गेले होते.