नांदेड ते उस्माननगर रोडवरील तेलंगवाडी येथे दि २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास यातील आरोपी जावेद शेख हा स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या विविध कंपनीचा गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू किमती १७,८०० रूपयाचा माल ॲटो क्रमांक एमएच २६ एके ३८४० किंमती १ लाख यामध्ये चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना मिळुन आला. याप्रकरणी फिर्यादी पोलिस उपनिरीक्षक गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी उस्मान नगर पोलीसात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील