बीड शहरात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून याचा फटका पोलीस विभागालाही बसला आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरल्याने कागदपत्रे, महत्त्वाची नोंदी व इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे ठाण्याच्या परिसरात पाणी साचले होते. हे पाणी थेट इमारतीत घुसल्याने कामकाजावर मोठा परिणाम झाला. नोंदी ठेवण्याची कागदपत्रे, गुन्हे तपासाशी संबंधित फाईल्स तसेच संगणक व इतर कार्यालयीन साहित्य पाण्यात भिजले.