बदलापूर पूर्व परिसरामध्ये चोरट्याने घरफोडी करून मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केली होती. त्यानंतर पुन्हा दत्तवाडी परिसरामध्ये तोच चोरटा चोरी करण्याच्या उद्देशाने आला असता स्थानिक नागरिकांनी त्याला पकडले आणि चांगला चोप दिला. त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर रीतसर कारवाई केली आहे. मात्र घटनेच्या सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून हा सीसीटीव्ही समोर आला आहे.