मराठा आरक्षणासाठी सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा होत आहे. कळंब मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.२ सप्टेंबर दुपारी ५.३० वाजता फटाक्याची आतषबाजी करत मराठा समाजाकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. मनोज जरंगे पाटील यांच्यामुळे आरक्षण लढा यशस्वी झाला आज आमची दिवाळी असल्याची भावना मराठा कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.