राधानगरी धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे आज शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी 12.58 वाजता राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 पुन्हा एकदा उघडण्यात आला आहे. यासोबतच दरवाजा क्रमांक 6 देखील उघडण्यात आल्याने धरणातून विसर्ग वाढला आहे.सध्या स्वयंचलित द्वार क्रमांक 3 व 6 मधून 2856 क्युसेक तर बीओटी पॉवर हाऊस मधून 1500 क्युसेक अशा एकूण 4356 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे.सततच्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाणीसाठा वाढत असून,त्यामुळे विसर्ग आवश्यक झाला आहे.