राधानगरी तालुक्यातील पनोरी इथल्या 73 वर्षीय श्रीमंती हरी रेवडेकर या वृद्ध महिलेच्या क्लिष्ट खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आला आहे. याप्रकरणी अभिजीत पाटील आणि कपिल पातले या दोघांना अटक केला असून ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राधानगरी पोलीस यांनी संयुक्तरीत्या केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली.