मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे हैदराबाद गॅजेट लागु करण्याचा जीआर राज्य सरकारने काढला. या निर्णयाविरोधात नांदेड येथील शिवा संघटनेचे अधक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावरून नांदेड मध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण होण्याची आहेत. कारण आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी 1 च्या दरम्यान सिरसनगाव मनोहर धोंडे यांच्या संस्थेच्या आश्रम शाळेतून आपल्या पाल्यांच्या टीसी काढून घेण्यासाठी तब्बल 21 मराठा पालकांनी अर्ज केला.