अकोल्यात अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अकोल्यात आज वंचित बहुजन आघाडीकडून एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलाय.. जिल्ह्यात अनेक ठिकाणी गायरान अर्थात ई-क्लास जमीन असून त्यावर ग्रामस्थांकडून पिके घेतली जातात. स्थानिक प्रशासन अनेकदा हे अतिक्रमरण हटवत असते. मात्र यातून संबंधित शेतकरी, शेतमुजरांचे प्रचंड नुकसान होते. तर दुसरीकडे त्यांच्या जमिनीवर सोलर प्लांट लावण्यात येणार असल्याच्या विरोधात काढला.