आज रविवार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ नुसार बिलोली तालुक्यातील खतगाव परीसरात पुराच्या पाण्यातून जाताना मुरूमाने भरलेला हायवा वाहन पलटला असल्याची घटना घडली आहे. या घटनेत हायवा वाहन चारकाने प्रसंगावधान राखून आपला जीव वाचविला आहे. नांदेड शहर तथा संपुर्ण जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे तर कुठे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.