चांगदेव या गावात अंकुश राजेंद्र चौधरी हे राहतात. त्यांच्या घराला एसीमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली. या आगीमध्ये त्यांच्या घरातील एसी, टीव्ही, आयफोन,रूमचे फर्निचर, फ्लोरिंग, सागवानी लाकडापासून तयार दरवाजे खिडक्यात जळून खाक झाले. यामध्ये त्यांची तब्बल २२ लाखांचे नुकसान झाले आहे. तेव्हा याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.