लातूर -लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसात प्लास्टिक विरोधात जप्तीची मोहीम राबविण्यात येत आहे. रविवारीही मोहीम सुरू होती. या अंतर्गत शहरातील १८ प्रभागात आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकाच वेळी धाडी टाकून ९५० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून १ लाख ६५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. अशी माहिती मनपाच्या वतीने आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.