यावल शहरातील बाबूजी पुरा भागात मोहम्मद हन्नान खान या सहा वर्षीय बालकाची शेख शाहिद शेख बिस्मिल्ला खलिफा वय २२ याने त्याच्या घरात बालकाची हत्या करून त्याचा मृतदेह जाळून टाकला होता व विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिकोनातून त्याला एका कोठीत लपवले होते. याची माहिती त्याच्या वडिलांनी पोलिसांना दिली व हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या बालकावर यावल ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी शवविच्छेदन केले जात आहे.