पालम तालुक्यात गेल्या दोन दिवसा पासुन मुसळधार पाऊस चालू आसल्याने आज गुरुवार 28 ऑगस्ट रोजी पालम तालुक्यातील बनवस, रामापुर तांडा, गिरीधर वाडी, तावजी वाडी, फत्तुनाईक तांडा, मरडसगाव आदी गावचा आठ तासापासुन संपर्क तुटला आहे. बनवस गावच्या आजु बाजूने पाण्याचा वेढा झाल्याने गावकऱ्यांना गावा बाहेर जाणे कठीण झाले आहे. पावसाचे पाणी असंख्य नागरीकाच्या घरात व शेतात पाणी शिरले आसल्याने शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तसेच पालम शहरा जवळील पुयनी नदीला पूर आल्याने पुयणी गावचा संपर्क तुटला आहे.