शिरोळ नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे श्री कल्लेश्वर तलावातील ओव्हरफ्लो झालेले पाणी थेट रमाबाई हाऊसिंग सोसायटीतील गल्ली क्रमांक १ मधील मागासवर्गीय वस्तीत शिरले आहे.या पाण्यामुळे घरांमध्ये ओलसरपणा,दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.सदर वस्तीत साचलेल्या पाण्यामुळे लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी गुडघाभर पाण्यातून जावे लागत आहे.तसेच विषारी साप व इतर प्राणी घरात शिरण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.