तालुक्यातील उत्तर भागात असणाऱ्या सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पोपटखेड धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. धरणात देखील पाण्याची मोठी आवक होत असल्याने धरणाची दोन द्वारे पाच सेंटीमीटरने उघडण्यात आली आहेत. धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.